"मराठी भाषा गौरव दिन २०२० "

माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा! हिच्या संगाने जागल्या दर्‍याखोर्‍यातील शिळा...!!

मराठी भाषा दिवस निमित्ताने सालाबादप्रमाणे या ही वर्षी कार्यक्रम आयोजित केला. 
"लोक साहित्य - उत्सव मराठीचा" ही यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती. 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि परीक्षक म्हणून डॉ. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. स्मिता पाटसकर आणि सौ. तृप्ती वाघ यांनी उपस्थिती दर्शवली. 
या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेच आयोजन करण्यात आले त्यात चतुर्थ वर्षातील कु. प्रल्हाद वणवे याने विजेतेपद आणि प्रथम वर्षातील दीप्ती शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 
याच वेळी GPAT परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनाही डॉ. चंद्रकांत कोकरे आणि डॉ. महेश बुरांडे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या देखण्या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक संदिप क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. समस्त प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी मागितलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.